मुंबई : मुंबईतल्या एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत २२ जणांचे नाहक बळी गेले. स्टेशनवर पूल तुटला आणि शॉटसर्किट झाल्याची अफवा पसरली आणि एकच कल्लोळ उडाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चेंगराचेंगरीत चौथी इयत्तेत शिकणाऱ्या रोहित परब या मुलाचा मृत्यू झाला. रोहित आणि त्याचा भाऊ आकाश दसऱ्यानिमित्त खरेदीसाठी परेल मार्केटमध्ये जात होते. यावेळीच हा प्रकार घडला. 


या चेंगराचेंगरीत रोहितचा मृत्यू झाला. तर आकाश जखमी झाला. आकाशवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. बुलेट ट्रेनऐवजी रेल्वे सुरक्षा तसेच सुविधा कशा वाढवता येतील याकडे लक्ष द्या अशी मागणी नागरिक करतायत.