मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने (EPFO) पीएफची खाती आणखी सुरक्षित करण्यासाठी अनेक नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय.  साडे चार कोटी पीएफच्या खाती सुरक्षित ठेवण्यासाठी काही नियमांमध्ये बदल केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केवायसीबाबत अनेक तक्रारी मिळाल्यामुळे नियमांमध्ये बदल झाले आहेत. मूळ कागदपत्रांशिवाय आता केवायसीमध्ये ग्राहकांच्या माहितीत बदल होणार नाही. केवायसी कागदपत्रांची तीन स्तरावर तपासणी होणार आहे.



केवायसीसाठी सर्व दस्ताऐवज अपलोड झाल्यानंतरचं केवायसीमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन बदल शक्य होणार आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आलीय. पीएफ खात्यातून काढण्यात येणाऱ्या रकमेवरसुद्धा निर्बंध येणार आहेत.