मुंबई : कोरोनाचं संकट संपलं आणि मुंबईत साथीच्या आजाराने डोकं वर काढलं आहे. यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत नक्कीच वाढ झाली आहे. मुंबईमध्ये स्वाईन फ्लूचे 11 रुग्ण आढळून आले आहेत. त्या रुग्णांपैकी चार जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. याचसंदर्भात भाजप आमदार अमित साटम (Amit Satam) यांनी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (iqbal singh chahal) यांना पत्र लिहिलं असून यात त्यांनी खबरदारीच्या उपाययोजन करण्याबाबत सूचवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार अमित साटम यांचं पत्र
मुंबईत जुलैच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने नुकतीच विश्रांती घेतली असली तरी आठ दिवसांतच लेप्टोच्या रुग्णांची संख्येत काही प्रमाणात वाढली आहे. जुलैमध्ये लेप्टोचे ११ रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूचा ही प्रादुर्भाव कायम असून ३३ रुग्णांचे निदान झाले आहे.


मागील आठवडाभरात पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. परिणामी, लेप्टोचा प्रादुर्भाव वाढला आहे. शहरात १२ जुलैला लेप्टोचे पाच रुग्णांची नोंद झाली होती. मागील आठवडाभरात यात आणखी सहा रुग्णांची भर पडली आहे. जूनमध्ये शहरात लेप्टोचे १२ रुग्ण आढळले होते. जुलैमध्ये पावसाचा जोर वाढल्याने १७ जुलैपर्यंत ११ रुग्णांची नोंद झाली आहे.


शहरात डेंग्यूचा प्रसारही कायम असून जुलैमध्ये ३३ रुग्ण आढळले आहेत. जूनमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ३९ होती. हिवतापाचा प्रादुर्भावही सुरूच असून जुलैमध्ये २४३ रुग्ण आढळले आहेत. जूनमध्ये ३५० रुग्ण आढळले होते. डेंग्यूचा प्रादुर्भाव असला तरी जुलैमध्ये चिकनगुनियाचे मात्र शून्य रुग्ण नोंदले आहेत.



स्वाईन फ्लूचाही प्रादुर्भाव पावसाळा सुरू होताच स्वाईन फ्लूनेही डोके वर काढले आहे. आठवडाभरात फ्लूच्या रुग्णांची संख्या ३ वरून ११ वर गेली आहे. जानेवारी ते जुलैपर्यत राज्यात १५ स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. 


तरी आपण यासंदर्भांमध्ये योग्य त्या उपाययोजना कराव्यात आणि आपण कलेल्या कारवाईचा तपशील मला लेखी स्वरूपात कळवावा असं अमित साटम यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.