मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मोठा धक्का बसला आहे. मनी लॉण्ड्रींगप्रकरणी अनिल देशमुख यांना 4 दिवस म्हणजे 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने चौदा दिवसांची कोठडी मागितली होती. विविध तपास करण्यासाठी ईडीने कोठडी वाढवून मागवली होती. यावर अनिल देशमुख यांच्या वकिलांनीही युक्तीवाद केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उच्च न्यायालयात हे प्रकरण आलं तेव्हा ईडीतर्फे आरोपी नसल्याचं सांगण्यात आलं होतं. तसंच अनिल देशमुख यांना उच्च रक्त दाबाचा त्रास आहे, तसंच ह्दयविकाराचा त्रास आहे, त्यामुळे त्यांना कस्टडी देऊ नये असा युक्तीवाद अनिल देशमुख यांच्या वकिलांनी केला होता. पण न्यायालयाने अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली. 6 नोव्हेंबरनंतर अनिल देशमुख यांना पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांना घरचं जेवण आणि औषध देण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.


काल 13 तासाच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीनं अटक केली होती. काल दुपारी बारा वाजताच्या दरम्यान अनिल देशमुख हे अखेर ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले होते. यानंतर संध्याकाळी आठ वाजताच्या दरम्यान ईडीचे जॉईंट डायरेक्टर सत्यव्रत कुमार हे दिल्लीवरून थेट ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यांनी देखील अनिल देशमुख यांची चार तास चौकशी केली आणि अखेर रात्री 1 वाजताच्या दरम्यान देशमुख यांना ईडीने अटक केली. याची माहिती रात्री सत्यव्रत कुमार यांनी दिली.


आज सकाळी 10 वाजता देशमुख यांना वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, तिथून सकाळी 11 वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान किरीट सोमय्या यांनी या अटकेवर बोलताना अनिल देशमुख यांना अटक झाली असून पुढील नंबर हा अनिल परब यांचा असल्याचं म्हटलं आहे.


अनिल देशमुख यांच्यावर आरोप