दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला होता. कोरोनाच्या संकटात अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कुलगुरूंबरोबर अंतिम वर्षाच्या परीक्षा कशा घ्यायच्या? याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक काल बैठक घेतली होती. परीक्षा कशा प्रकारे घेता येईल यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्य सामंत यांनी म्हटलं की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर परीक्षा कशा घ्यावी यासाठी समिती नेमली होती. आज या समितीबरोबर तसंच इतर कुलगुरूंशी चर्चा झाली. सर्व विद्यापीठातील 7 लाख 92 हजार 385 विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची आहे. विद्यापीठांनी शासनाला विनंती केली आहे. यूजीसीकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ मागावी. काही विद्यापीठांनी १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मागावी अशी विनंती केली आहे. आम्ही आज याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. परवा आपत्कालीन व्यवस्थापन समितीची बैठक होईल.'


'ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतल्या जातील असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. 'काही विद्यापीठे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निकाल लावतील. विद्यार्थींना घराबाहेर पडून परीक्षा द्यावी लागणार नाही. परीक्षा कशा पद्धतीने, कोणत्या सोप्या पद्धतीने घ्यायच्या याबाबत समिती परवा आपला प्रस्ताव सादर करणार आहे. विद्यार्थींनी घरातूनच परीक्षा द्यावी याबाबत कुलगुरूंचे एकमत झालं आहे. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.'


'कोरानाच्या काळात परीक्षा घेणं जिकिरीचे आहे, पण कुलगुरू ते योग्य पद्धतीने पार पाडतील. परीक्षा कमी मार्कांची असेल त्यामुळे विद्यार्थ्यांवर ताण येणार नाही.' असं उद्य सामंत यांनी म्हटलं आहे. 


राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं की, 'विद्यार्थी घरीच सुरक्षित कशी परीक्षा देऊ शकतील याबाबत आम्ही विचार करतोय. ऑफलाईन, एमसीक्यू, ओएमआर, ओपन बुक, असाईनमेन्ट बेस असे पर्याय आहेत. ज्या द्वारे घरी बसून विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील.'