मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार १४ जूनला होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची मंत्रालयात बैठक सुरु आहे. या बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही उपस्थित आहेत. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार हेही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला मंत्रालयात दाखल झाले आहेत. शिवाय बंडखोर काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकरही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे.



विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत आहे. केवळ तीन महिनेच नव्या मंत्र्यांना मिळण्याची शक्यता आहे. या तीन महिन्यात किती कामे होणार याचीही चर्चा सुरु झाली आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांना या विस्तारात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यात आघाडीवर नाव आहे ते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे. मुख्यमंत्री कोणाला पसंती देतात, याकडेही लक्ष लागले आहे.