मुंबई : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक झाल्यानंतर लसीकरणावर (vaccination) भर देण्यात आला आहे. मात्र, मुंबईत बोगस कोरोना लसीकरण (bogus vaccination) झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. मुंबई चार ते पाच ठिकाणी बोगस लसीकरण (bogus vaccination) झाले. मात्र, याची कोणालाच माहिती मिळाली नाही. ज्यावेळी काही लोकांनी कोरोना लसीकरणाबाबत प्रमाणपत्र मागितले. त्यावेळी हा सगळा बोगस प्रकार पुढे आला. आता मुंबईत 2 हजार 53 जणांचे बोगस लसीकरण झाल्याची महापालिकेकडून कबुली देण्यात आली आहे. या बोगस लोकांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे, असे मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात बोगस लसीकरण झाले होते. तब्बल 2 हजार 53 जणांचे बोगस लसीकरण झाल्याचे पुढे आले आहे. तशी कबुली महापालिकेकडून मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. एकाच टोळीने कांदिवली, बोरिवली, वर्सोवा, खार अशा पश्चिम उपनगरांतील वेगवेगळ्या ठिकाणी ही बनावट लसीकरणाची खासगी शिबिरे घेण्यात आली होती. यावर न्यायालयाने पालिकेला स्पष्ट शब्दात बजावले आहे. यापुढे बोगस लसीकरण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा आणि ज्यांनी बोगस लसीकरण केले आहे, अशा आरोपींवर कठोर करवाई करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिला आहे. 


मुंबई महापालिकेने तात्काळ बोगस लसीकरण रोखण्यासाठी तातडीने पावले उचला. वेळ काढू नका. सध्या प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. या बनावट लसीकरणाला बळी पडलेल्यांचा जरा विचार करा. त्यांना कल्पनाही नसेल की त्यांच्या शरीरात लस सोडण्यात आली आहे का, की अन्य काही?. त्यामुळे वेळ काढू नका. तात्काळ कारवाई करा. हे प्रकरण अजिबात वेळकाढण्यासारखे नाही, अशा खरमरीत शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेची कानउघडनी केली आहे. 


दरम्यान, उच्च नय्यालयाने फटकारल्यानंतर आता 29 जूनच्या पुढील सुनावणीत यावर उपाययोजना सादर करण्याचे निर्देश पालिका आणि राज्य सरकारला दिले आहे. तर दुसरीकडे बोगस लसीकरणाबाबत पोलिसांनी तपास सुरु केला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.