मुंबई : देशात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट कमकुवत होताना दिसली तरी ब्लॅक फंगसचा धोका मात्र वाढला आहे. ब्लॅक फंगसचा धोका मोठ्यांसोबत लहानग्यांना देखील आहे. मुंबईतील तीन मुलांचे ब्लॅक फंगसमुळे डोळे काढण्यात आले आहेत. (Eyes Of 3 Children Infected With Black Fungus Removed In Mumbai) महाराष्ट्रात 4 ते 16 वर्षांच्या मुलांना ब्लॅक फंगसचा धोका असल्याच समोर आलं. लहान मुलांमध्ये ब्लॅक फंगस आढळून आल्याने डॉक्टर देखील हैराण झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्लॅक फंगसच्या वाढत्या आकड्याबाबत बोलताना फोर्टिस रुग्णालयाचे वरिष्ठ कंसल्टंट आणि पीडियाट्रीशियन डॉ. जेसल शाह यांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे. महाराष्ट्रात अनेक मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुक्त झालेल्या लहान मुलांना ब्लॅक फंगसचा धोका पाहायला मिळत आहे. रूग्णालयात उपचार घेण्याकरता आलेल्या दोन मुलींना ब्लॅक फंगस असल्याच समजलं. या दोघी रूग्णालयात आल्या त्यानंतर अवघ्या 48 तासांत यांचा डोळा काढण्यात आला. 


डॉक्टर शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅक फंगस लहान मुलांच्या नाक, डोळे आणि सायनसमध्ये पसरला आहे. महत्वाचं म्हणजे ही काळी बुरशी मुलांच्या मेंदूपर्यंत पोहोचली नव्हती. सहा आठवडे मुलींवर उपचार केल्यानंतर अखेर मुलींचे डोळे काढण्यात आले. डोळे आणि कॅन्सर सर्जन डॉ. पृथेश शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना ब्लॅक फंगसचा धोका अधिक पाहायला मिळाला. यामध्ये दोन मुलींचे डोळे काढण्यात आले.  


कोरोना व्हायरस संक्रमित 4, 14 आणि 16 वर्षांच्या मुलींना काळ्या बुरशीची लागण झाली. तसेच कोरोनानंतर या दोघींमध्ये मधुमेह असल्याचं जाणवलं. 14 वर्षांच्या मुलीचा डोळा काढण्यात आला आणि 16 वर्षांच्या मुलीच्या पोटात काळी बुरशी सापडली.