मुंबई : राज्यात शुक्रवारी मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव पार पडला. तब्बल 2 वर्षांनी कोरोनानंतर पहिल्यांदाच दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे सर्वसामांन्यासह गोविंदामध्ये उत्साह पाहायला मिळाला. राज्य सरकारने दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गोविंदासाठी मोठ्या घोषणा केल्या. यातच आता सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होतोय. (fact check maharashtra chief minister eknath shinde dance video viral know what true what false)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्याचा बेफाम डान्स करतानाचा व्हीडिओ व्हायरल झालाय.  या व्हीडिओत डान्स करत असलेली व्यक्ती मुख्यमंत्रीच असल्याचा दावा केला जातोय. मात्र ती व्यक्ती मुख्यमंत्री नाही. या व्यक्तीची दाढी, जवळपास शरीरयष्टी आणि पेहराव हा मुख्यमंत्र्यांसारखाच आहे. त्यामुळे डान्स करणारी व्यक्ती ही मुख्यमंत्रीच असल्याचा गैरसमज झालाय. असं असलं तरीही हा व्हीडिओ तुफान व्हायल होतोय.