Fact Check : अनुभवी ग्राफिक्स डिझायनरवर रिक्षा चालवण्याची वेळ, व्हायरल होणाऱ्या या पोस्टमागचं सत्य काय?
Layoff : गेल्या काही दिवसांपासून नव्याने रिक्षाचालक झालेल्या कमलेश काटकरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. 14 वर्षांचा कामाचा अनुभव असूनही त्याच्यावर रिक्षा चालवण्याची वेळ का आलीय? या व्हायरल होणाऱ्या पोस्टमागचं सत्य काय? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
सध्या ग्राफिक्स डिझाइनर्स यांना मार्केटमध्ये चांगले जॉब आहे, असं म्हटलं जातंय. पण 14 वर्षांचा अनुभव असलेल्या ग्राफिक डिझायनरला आजकाल मुंबईच्या रस्त्यावर ऑटोरिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. ही गोष्ट आहे कमलेश कामतेकर यांची. 2024 च्या सुरुवातीला त्याची नोकरी गेली. त्यानंतर पुढील पाच-सहा महिन्यांसाठी त्याने नवीन नोकरी शोधली. अनेक कंपन्यांना सीव्ही आणि रिझ्युमे पाठवले. पण नोकरी मिळाली नाही.
पाच महिने नोकरीशिवाय राहिल्यानंतर कमलेश कामतेकर यांनी ऑटोरिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. कमलेशचे लिंक्डइनवर 28000 फॉलोअर्स आणि 500 हून अधिक कनेक्शन आहेत. त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलवर, त्याने स्वत: ला एक असिस्टेंट क्रिएटिव मॅनेजर आणि ग्राफिक डिझायनर म्हणून वर्णन केले आहे.
असिस्टंट क्रिएटिव्ह मॅनेजर ही माझी शेवटची नोकरी
कमलेश कामतेकर यांनी त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलवर लिहिले आहे की, कंपनीतील कोस्ट कटिंगमुळे माझी नोकरी गमावून जवळपास पाच महिने झाले आहेत. ग्राफिक डिझायनिंगमधील 14 वर्षांचा अनुभव असलेली असिस्टंट क्रिएटिव्ह मॅनेजर म्हणून माझी पूर्वीची नोकरी गमावल्यानंतर मी नवीन नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत होतो.
सर्वत्र मिळाला फक्त नकार
कमलेशने लिहिले की, “पाच महिन्यांनंतरही मला नवीन नोकरी मिळालेली नाही. मी माझ्या मित्रांकडून बरेच रेफरन्स घेऊन प्रयत्न केले. पण मला अजून नवीन काम मिळालेले नाही. मी लिंक्डइनवरही अनेक वेळा अर्ज केला, पण प्रत्येक वेळी माझा अर्ज नाकारला जात होता. नोकरीसाठी सीव्ही पाठवताना तुम्हाला अनेकदा सांगितले जाते, “माफ करा, तुमच्या सध्याच्या भूमिकेसाठी आमच्याकडे बजेट नाही किंवा तुमच्या अनुभवाशी निगडीत आमच्याकडे नोकरी नाही. कोणी म्हणेल की, तुम्ही कमी पगाराच्या बजेटमध्ये काम करू शकता का?…” गेल्या 5 महिन्यात मला असाच प्रतिसाद मिळाला आहे.
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला
कमलेशने पुढे लिहिले की, सर्वत्र रिजेक्ट झाल्यानंतर मला वाटले की, दुसरीकडे कुठेतरी काम करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय का करू आणि कमी पगारात का होईना पैसे का कमवू नये. निदान माझी स्वतःची कमाई असेल. मग मी ठरवले, "नोकरी नको, मी आता माझा स्वतःचा व्यवसाय करेन." म्हणून मी माझ्या सर्व डिझाइनिंग कौशल्यांचा त्याग केला आणि ऑटो रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला.
सत्य काय?
कमलेशची ही स्टोरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण कमलेशची ही स्टोरी सत्य आहे का? काय आहे या व्हायरल बातमी मागचं खरं कारण? तर कमलेशचं हे linkedin प्रोफाईल अपडेट आहे.