मुंबई : बाळासाहेब थोरात यांनी झी 24 तासशी बोलताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीस यांना आरोप करण्याचा अधिकार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आम्ही परिस्थिती समजून घेऊन लोकांना दिलासा देण्याचं काम आम्ही करतोय. जेव्हा कोल्हापूर, सांगलीला पूराची स्थिती होती, लोक बुडत होते तेव्हा फडणवीसांचा गाजावाजा करत विदर्भाचा दौरा सुरू होता. यावर राजकारण कोणी करू नये. मदत कशी करता येईल ते एकत्रित पाहू. राज्य सरकार मदत करेलच, यांचं केंद्रात सरकार आहे त्यांनी दिल्लीत जाऊन मोदींना भेटून मदत मागितली तरी जास्त चांगला दिलासा लोकांना आपण देऊ शकू.' असं देखील थोरात यांनी म्हटलं आहे.


'सांगली, कोल्हापूर पूरपरिस्थित भाजपचं कुणी फिरकलं नाही. तेव्हा त्यांनी जी मदत जाहीर केली ती आम्ही सत्तेत आल्यावर दिली, त्यांनी मदत दिली नाही. आम्ही तेव्हा ज्या मागण्या केल्या त्या त्यांनी कुठे पूर्ण केल्या. शरद पवार आमचे मार्गदर्शक आहेत, आघाडीचे नेते आहेत, आम्ही सर्व एकत्र काम करतोय. सर्व नुकसानीचे लवकरात लवकर पंचमाने संपतील आणि पुन्हा तिथलं जीवन उभं राहिल असा दिलासा आम्ही देऊ.' असं देखील थोरात यांनी म्हटलं आहे.