अवयवदान करून मृत मुलाला ठेवले जीवंत
अवघ्या १९ वर्षाच्या मुलाला अपघातात गमावलेल्या आई-वडिलांनी आपलं दुःख बाजूला ठेवून केलं मृत मुलाचे अवयवदान.
मुंबई : अवघ्या १९ वर्षाच्या मुलाला अपघातात गमावलेल्या आई-वडिलांनी आपलं दुःख बाजूला ठेवून केलं मृत मुलाचे अवयवदान.
नवी मुंबईतील ऐरोली येथे राहणारे महेंद्र सोनावणे यांचा तिसरा मुलगा सिद्धेश सोनावणे हा अवघा १९ वर्षाचा होता. परिक्षेला जाताना या मुलाचा अपघाती मृत्यू झाला. सोनावणे कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. पण अशा परिस्थितीतही आपलं दुःख बाजूला सारून त्यांनी सिद्धेशचे नेत्रदान आणि त्वचादान केले आणि समाजासमोर एक चांगले उदाहरण ठेवले आहे.
सोनावणे कुटुंबियांना ३ अपत्य दोन मुलांची लग्न झाले असून सिद्धेश हा त्यांचा तिसरा मुलगा. उत्तम करिअरकरून स्वतःचा उद्योग सुरू करण्याची स्वप्न बाळगणाऱ्या सिद्धेशवर काळाने घाला गेला. या अपघातात संपूर्ण सोनावणे कुटूंब कोलमडून गेले. मात्र अवयव दानाचं महत्व माहित असलेल्या या कुटुंबाने मोठा पुढाकार घेतला. सोनावणे हे जीवन विद्या मिशनच्या ऐरोली उपक्रेंद्रातील सक्रिय सदस्य आहेत.
अवयवदानाचा ठेवला नवा आदर्श
सिद्धेश शरीररूपाने आपल्यात हजर नाही.परंतु त्याने दान केलेल्या डोळ्यांच्या माध्यमातून तो आज सुद्धा हे विश्व सहज पाहू शकतो, अशी सोनावणे कुटुंबायांची धारणा आहे. खरोखरच दुःखद प्रसंगात पण स्वतःला सावरून आपल्या पोटच्या गोळ्यांचं नेत्रदान आणि त्वचा दानाचा निर्णय घेणाऱ्या पालकांना सलाम.