Crime News : प्रेमाचं नातं सर्वांनाच चांगले दिवस दाखवेल असं नाही. कारण अनेकांसाठी हेच नातं अडचणींचं कारण ठरतं. या नात्याचं असंच एक रुप नुकतंच पाहायला मिळालं. (Madhya Pradesh) मध्य प्रदेशातील घटनेमुळं हा प्रकार उघडकीस आला, जे पाहून अनेकांचंच डोकं चक्रावलं. एका अभिनेत्रीच्या त्रासाला कंटाळून इथं दोन महिला आणि एका पुरुषानं विषप्राशन करत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. एका व्हिडीओच्या माध्यमातून ही घटना समोर आली. (Crime Viral video)


व्हिडीओमध्ये असणाऱ्या व्यक्ती कोण? (Viral Video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्यांमध्ये आशी खान नावाचीही एक व्यक्ती आहे. यामध्ये त्यांच्यासोबत त्यांची पत्नी इंशा आणि आई परवीन दिसत आहे. मुंबईस्थित स्वत:ला अभिनेत्री म्हणवणारी महिला आपल्याला सतत त्रास देत असल्याचं तिनं सांगितलं. सदर कथित अभिनेत्रीनं आधी मुंबई (Mumbai) आणि त्यानंतर उज्जेनच्या महाकाल पोलीसांत आशी खान यांच्याविरोधात कलम 376 अंतर्गत तक्रार दाखल केली होती. 


हेसुद्धा वाचा : Video : Mumbai मेट्रोमध्ये तरुणाचा लागला डोळा आणि त्याचा सोबत तरुणीने केलं असं कृत्य


 


दोन्ही वेळेस या तरुणीनं खान यांच्याकडून लाखो रुपये उकळले होते. तिला आणखी पैशांचा हव्यास असल्याची माहिती खाननं दिली. इतक्यावरच न थांबता तिच्याच त्रासाला कंटाळून आपण विष घेत असल्याचं म्हणत त्यानं पत्नी आणि आईसह टोकाचं पाऊल उचललं. दरम्यान, या विचलित करणाऱ्या व्हिडीओची माहिती मिळताच घटनास्थळावरून त्या तिघांनाही तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. 


आशी खानला धमकवणारी अभिनेत्री कोण?


इथे खान कुटुंबीयांनं टोकाचं पाऊल उचलेलं असतानाच त्यांना धमकावण्याचे आरोप असणारी कथित अभिनेत्रीही समोर आली आणि तिनं हे सर्व आरोप धुडकावून लावले. इतकंच नव्हे तर, खान यांच्याकडून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेल्याचा खळबळजनक दावा तिनं केला. (relationship threats)


'मी आशीवर प्रेम करते. मी त्याच्या बाळाची आई होणार आहे. पण, पोलिसांतून सुटका झाल्यानंतर त्यानं दिलेला शब्द विसरत मी कशी चुकीची आहे हे दाखवून देण्यासाठी हे ढोंग रचलं', असा गौप्यस्फोटही तिनं केला.


कोण आहे आशी खान? 


पोलिसांच्या तपासातून उघड झालेल्या माहितीनुसार आशी खान मुंबईतील ओशिवरा येथे राहत असून तो तिथं गार्मेंटचा व्यवसाय करतो. कथित अभिनेत्रीसोबत तो दोन वर्षे लिव्हइन रिलेशनशिपमध्ये होता असंही सांगण्यात येत असून, ती युवती मुळची गुवाहाटीची असल्याचं सांगण्यात येत आहे. हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचलं त्यावेळी मात्र आशीनं पाठ फिरवली आणि या तरुणीनं मुंबई पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली. 


जामीनावर त्याची कशीबशी सुटका झाली, पण त्यानंतर या तरुणीनं पुन्हा एकदा त्याच्या विरोधात मारहाण आणि अश्लीलतेचा गुन्हा दाखल करत पुन्हा त्याला गडाआड पाठवलं. इथूनही त्याची सुटका झाली आणि त्यानंतर त्यानं कुटुंबासह विषप्राशन करत टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं गेलं. 


(घटनेचा व्हिडीओ विचलीत करणारा असल्यामुळं तो इथं दाखवण्यात आलेला नाही.)