Ravindra Mahajani Passed Away : मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि गश्मीर महाजनी याचे वडील रवींद्र महाजनी यांचं अकाली निधन झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धक्कादायक गोष्ट म्हणजे तळेगाव दाभाडेमधील एका घरात त्यांचा मृतदेह आढळला. ते राहत असलेल्या घरातून दुर्गंधी येतं असल्याचं शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं. त्यांनी पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला असता रवींद्र महाजनी मृतावस्थेत सापडले. 


महाजनी यांचं कुंटुंब मुंबईत राहायला आहे. अभिनेता गश्मीर महाजनीला वडिलांची निधनाची बातमी कळविण्यात आली. शविच्छेदनानंतर महाजनी यांचा मृतदेह कुंटुंबाकडे सोपविण्यात आला. मुंबईतील वैकुंठ स्मशानभूमीत आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन ते तीन दिवसांपूर्वीच त्यांचं निधन झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (famous marathi actor ravindra mahajani Passed Away gashmeer mahajani father Mumbaicha Fauzdar )



वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या आठ महिन्यांपासून ते आंबी या ठिकाणी एका भाड्याच्या घरात एकटेच राहत होते. घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानं शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना ही माहिती दिली. 


रवींद्र महाजनींनी 1975 ते 1990 चा काळ गाजवला होता. मराठीतील विनोद खन्ना अशी त्यांची ओळख होती. मुंबईत टॅक्सी चालवून ते अभिनय क्षेत्रात आले. तब्बल तीन वर्ष त्यांनी टॅक्सी चालवली आहे. अगदी ते टॅक्सी चालवतात म्हणून नातेवाईकांनी त्यांच्याशी संबंध तोडले होते. व्ही शांताराम यांच्या झुंज चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.  त्यांनतर देखण, रुबाबदार, दमदार अभिनय या जोरावर त्यांनी अनेक चित्रपट गाजवले.  रवींद्र महाजनी यांचा मुंबईचा फौजदार, देवता हे चित्रपट खूप गाजले. मात्र त्यांच्या मृतदेह अशा अवस्थेत आढळल्याने मराठी चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. 


रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावमध्ये झाला. त्यांचे वडील ह. रा महाजनी हे स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार होते. त्यांच्या निधनानंतर रवींद्र महाजनी यांच्यावर घराची जबाबदारी आली आर्थिक जबाबदारी सांभाळण्यासाठी मिळेल ते काम त्यांनी केलं. पण जेव्हा त्यांनी टॅक्सी चालविण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मात्र संपादकाचा मुलगा टॅक्सी चालवतो अशी त्यांच्यावर टीका झाली. 


झुंज जरी त्यांचा पहिला चित्रपट होता पण त्यांनी सुरुवात मधुसुदन कालेलकर यांच्या जाणता अजाणता या नाटकातून सुरुवात केली. त्यानंतर तो राजहंत या नाटकातील त्यांचा अभिनय शांतारामबापूंना आवडला आणि त्यांना चित्रपटात संधी मिळाली. 



रवींद्र यांनी लेक गश्मीर महाजनी यांच्यासोबतही चित्रपटात काम केलं. पानिपत आणि देऊळ बंद आहे यात बापलेकांची जोडी दिसून आली.