मुंबई : शेतकरी विधेयकावर कॉंग्रेसचा आक्षेप बेगडी असून ते लबाडी करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. शेतकरी विधेयकावरुन कॉंग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी काल गदारोळ घातला. देशाच्या संसदेत असं वर्तन कधी पाहील नव्हतं. कॉंग्रेस आणि त्यांचे सहयोगी पक्ष खालच्या स्तरावर जाऊन काम करतायत. कॉंग्रेसला शेतकऱ्यांविषयी अजिबात प्रेम नाही. ते केवळ राजकारण करतायत असेही ते म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हमीभाव सरकार देणारच आहे असे पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय. जो कायदा तयार केलाय त्यात कंत्राटी पद्धतीने माल विकता येईल. खासगी क्षेत्रातील लोक शेतकऱ्याशी करार करुन माल विकत घेतील. लहान शेतकऱ्याला वाहतूक परवडत नाही, तो तंत्रज्ञान वापरत नाही. पण यामुळे साखळी तयार होईल. शेतकऱ्याने तयार केलेल्या मालावर त्याला ८ टक्के द्यावे लागत होते पण आता तस होणार नसल्याचे ते म्हणाले.


काल संसदेने दोन बील पास केले ते पूर्णपणे शेतकरी हिताचे आहेत. यामुळे लहान शेतकऱ्यांना फायदा होईल. कोल्ड स्टोरेजमधून थेट माल विकता येत नव्हता. बाजार समितीत शेतकऱ्यांना कर द्यावा लागायचा. माल कुठे विकला जावा, किती किंमत असावी ? यावर शेतकऱ्यांचे नियंत्रण नव्हते. सिंगल मार्केट झाल्याने देशाच्या कोणत्या कोपऱ्यात माल विकायचा आणि किती किंमतीत विकायचा हे शेतकरी ठरवतील. त्यामुळे ही दोन्ही बीलं क्रांतीकारी असल्याचे फडणवीस म्हणाले.



खासगी एपीएमसी सध्या काम करतंय. कॉंग्रेसचा लोकसभेच्या जाहीरनाम्यात शेतमालाचे निर्बंध हटवणार असे म्हटलंय. शहरात मुक्त बाजार उघड्यात येतील, अत्यावश्यक वस्तू कायदा रद्द करणे असे जाहीरनाम्यात म्हटलंय. पण कॉंग्रेसने काल राजकारण म्हणून विरोध केलाय. 


नीती आयोगाने टास्क फोर्स तयार केला होता. त्याचा मी अध्यक्ष होतो. हे तिन्ही कायद्यांच्या शिफारसी त्या टास्क फोर्सने केल्यायत. कमलनाथ यांचे मार्गदर्शन खूप मोलाचं होतं. कर्नाटकने देखील त्यावेळी तेच मत मांडल्याची आठवण फडणवीसांनी यावेळी करुन दिली.


शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, तंत्रज्ञान येणार हे या विधेयकात आहे. प्रत्येक ठिकाणी बाजार तयार होणार. देशातल्या कुठल्याही जागेत जिथे जास्तीत जास्त भाव मिळेल तिथे शेतकरी आपला माल विकू शकणार असल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केलं.