मुंबई : Farmer loan waiver : शेतकरी कर्जमाफी प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले. आम्ही पळ काढलेला नाही, उशीर झालाय हे मान्य आहे. पण आर्थिक मदत देणार आहोत, असे रोखठोक शब्दात अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली त्यांना  50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान आणि ज्यांचे कर्ज 2 लाखाच्यावर आहे आणि त्यांनी 2 लाख कर्ज फेडले आहे, त्यांचे वरील 2 लाखापर्यंत कर्ज शासन भरणार आहे, अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली.


अजित पवार यांची मोठी घोषणा


शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतुद करण्याची घोषणा अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. कर्जमाफीच्या निर्णय झाला त्यातही काही शेतकरी वंचित आहेत. पुरवणी मागण्यात राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी तरतूद केली आहे, असे ते म्हणाले.


 कोरोनात राज्याचे उत्पन्न कमी झाले आहे. यातून सरकार पळ काढणार नाही. वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकर्‍यांना 3 लाखापर्यंत शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले जात आहे, असे अजित पवार यांनी केली.