शेतकरी आत्महत्येचा तपास आठवड्यात पूर्ण करण्याचे आदेश
या परिपत्रकात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा तपास पोलिस निरिक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा तपास आठवड्यात पूर्ण करा, असे आदेश राज्य सरकारने पोलिसांना दिले आहेत. शेतकरी आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी एका आठवड्यात पूर्ण करा, असं परिपत्रकच राज्य सरकारनं काढलं आहे.
या परिपत्रकात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा तपास पोलिस निरिक्षक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई लवकरात लवकर देण्याच्या दृष्टीकोनातून शेतकऱ्याच्या मृत्यूचं कारण तात्काळ शोधणं गरजेचं असल्यानं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्यात लक्ष द्यावं असे निर्देशही या पत्रकातून देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रकरणात न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेनं दोन दिवसात आपला अहवाल पोलिसांना सोपवावा असे आदेशही या परिपत्रकातून देण्यात आले. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळण्यास मदतच होणार आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई मिळण्यासंबंधी काल झालेल्या बैठकीत सूचना करण्यात आल्या.