सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई - राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक झाली त्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनेक विषयांवर पाहणी करण्यात आली. या बैठकीत त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय देखील घेतले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या बैठकीत त्यांनी ऑक्टोबरमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यावर त्यांनी नवीन निर्णय घेतले. (Farmers lost due to return rains Chief Minister eknath shinde instructions to complete Panchnama quickly nz)


हे ही वाचा - सेक्स रॅकेटचा धक्कादायक प्रकार, 72 वर्षीय वृद्धाला ब्लॅकमेल करत उकळले लाखो रुपये


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी आत्तापर्यंत 4700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाने ऑक्टोबर 2022 मध्ये अवेळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांच्यासाठी देखील मदत देण्याचा निर्णय आज घेतला गेला.


हे ही वाचा - आदित्य ठाकरेंनी कोणाला फुकट सल्ला देऊ नये, राधाकृष्ण विखेपाटील यांच्या टीकेवर दानवेंचं उत्तर



ऑक्टोबरमध्ये अचानक पावसामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 25 लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आजपर्यंत कधीही सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जात नव्हती. मात्र आमच्या सरकारने प्रथमच अशा शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी सुमारे 750 कोटी रुपये इतके वाटप करण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेला सततचा पाऊस आणि नुकसानीसाठी हेच निर्णय लागू करण्यात येणार आहेत.


हे ही वाचा - शिवसेना कार्यकर्त्यांनी उधळपट्टी केल्याचा VIDEO आला समोर 



आम्ही महसूल आणि कृषी विभागाला निर्देश दिले होते, त्याप्रमाणे सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने सुरू असून यासंदर्भात प्रशासनाला सूचना दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत चर्चा झाल्याप्रमाणे या शेतकऱ्यांचे पंचनामे लवकरात लवकर संपावावेत असे निर्देश देण्यात आले आहेत म्हणजे त्यांना मदत करता येईल.


दरम्यान मदत व पुनर्वसन विभागाने माहिती दिल्याप्रमाणे जून-जुलै पासून सुरू असलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या 40 लाख 15 हजार 847 शेतकऱ्यांना सुमारे 4700 कोटींची मदत करण्यात आली आहे. ही मदत एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीने जास्त व दोन ऐवजी तीन हेक्टरअशी वाढीव आहे.


हे ही वाचा - पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्याची थट्टा, नुकसान भरपाईचे दिले पाच रुपये



या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही अंतिम टप्यात आहे. लवकर याबाबत विहित नमून्यात शासनास निधी मागणीचे प्रस्ताव प्राप्त होतील. शासन शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील असून मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत या शेतीपिकांच्या नुकसानीची दखल घेण्यात आली. ऑक्टोबर 2022 मधील या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दुप्पट दराने 3 हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्याचे शासनाकडून आश्वासित करण्यात येत आहे.