COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1) दलितांच्या समर्थनार्थ देशभरात काँग्रेसचं आज एकदिवसीय उपोषण...राहुल गांधींचं राजघाटावर उपोषण सुरु, राज्यातही सर्व जिल्हा मुख्यालयातही लाक्षणिक उपोषण...


2) दलितांच्या रोषाचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंना फटका, सूरतमध्ये संतप्त तरूणाने टाकलं आठवलेंच्या अंगावर काळं कापड, दलितांवर अत्याचार होत असूनही आठवलेंनी मौन बाळगल्याचा आरोप....


3) अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंना अटक, तर संग्राम जगतापांनानंतर राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगतापांना अटक होण्याची शक्यता....


4)  केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी नदी जोड प्रकल्पाला ब्रेक लागण्याची शक्यता...देशातल्या सर्वच नद्यांचं एकत्रीकरण आणि राष्ट्रीयीकरण करता येणार नाही... सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल....


5) वाघाला गोंजारण्याचे दिवस संपले, सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचा भाजपला इशारा, युतीसाठी आता टाळी मिळणार नाही, शिवसेनेनं केलं स्पष्ट 


6)  गोंदियातील खमारी गावात बाटली आडवी करण्यासाठी महिला आक्रमक, दारुचे बॉक्सेस रस्त्यावर फेकत व्यक्त केला निषेध, महिलांवरच गुन्हे दाखल झाल्याने संपुर्ण गावात रोष


7) सांगली जिल्ह्यात विवाहितेची तीन मुलींसह विहिरित उडी मारून आत्महत्या...आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट....


8) कर्नाटक विधानसभेसाठी भाजपची पहिली उमेदवारी यादी जाहीर.. पहिल्या यादीत येडियुरप्पांसह 72 जणांचा समावेश.. निवडणुकीत रंगत यायला सुरुवात...


9)  राष्ट्रकूल स्पर्धेत पदकांची लयलूट सुरुच.. सकाळपासून 5 पदकांची कमाई,  नेमबाज जितू रायला सुवर्ण पदक, 105 किलो वजनी गटात प्रदीप कुमारची रौप्य कमाई.. आतापर्यंत भारताकडे 17 पदकं.. 


10) आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल विरुद्ध हैदराबाद सनराय़झर्स हैदराबादचा सामना. कोलकाता नाइट रायडरचा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुवर 4 गडी राखून विजय..