विरार : विरारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. मुलीच्या आत्महत्येनंतर निराश झालेल्या एका पित्यानं रेल्वेखाली आपलं जीवन संपवलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन दिवसांत एक कुटुंब उद्ध्वस्त झालंय. मंजुळा मोथुकृष्णा नायडू या २६ वर्षीय मुलीनं २८ जून रोजी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. तिनं ही आत्महत्या का केली हे उघडकीसही आलं नाही तोवर तिच्या वडिलांनीही आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.


मंजुळाच्या वडिलांनी - मोथुकृष्णा नायडू (६० वर्ष) यांनी आपल्या मुलीचा विरह सहन न झाल्यानं २९ जून रोजी धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. 


आज या बाप - लेकीवर एकत्रच नालासोपाऱ्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.