मुंबई : मुंबईमध्ये पुरवण्यात येणाऱ्या दुधात भेसळ होते का? याच्या तपासणीसाठी मध्यरात्री अन्न व औषध प्रशासनातर्फे दुधाच्या गाड्या आणि टँकरची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आलीय. मुंबईत येणाऱ्या पाच प्रवेश मार्गांवर दुधाची तपासणी करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत रोज मोठ्या प्रमाणावर दुधाची मागणी असते. त्यात नवरात्र आणि पुढील महिन्यात येणाऱ्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुधाला मोठी मागणी असते. 


अशावेळी मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त दूध बाजारात विक्रीसाठी आणलं जाऊ शकतं. या भेसळयुक्त दुधावर आळा बसावा तसेत दूध विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करता यावी, या उद्देश्याने तपासणी करण्यात आली. 


तपासणी सुरू असताना दोन दुधाच्या टँकरमधील दूध भेसळयुक्त असल्याची धक्कादायक बाब समोर आली. 


यामध्ये अमोनियम सल्फेट आणि माल्टोडेस्ट्रीन हे केमिकल दुधात मिसळून हे भेसळयुक्त दूध बनविण्यात आले असल्याचे निष्पन्न झालंय.