Maharashtra Politics : दिल्लीतल्या दंगलीचं लोण महाराष्ट्रातही पोहोचतंय की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. कारण मुंबईतील आरे कॉलनीपासून अमरावतीच्या अचलपूरपर्यंत सध्या धार्मिक तेढ वाढली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिकडेच दंगलीच्या झळा बसलेल्या अमरावतीतल्या अचलपुरात दुल्हा गेटवर झेंडा लावण्यावरून वाद झाला. या वादाचं रुपांतर तुफान दगडफेकीत झालं. जमावानं पोलिसांच्या दिशेनंही दगडफेक केली. या घटनेनंतर अचलपूर आणि परतवाडा शहरात कलम 144 लागू करून संचारबंदी लावण्यात आली.


तर रविवारी रात्री मुंबईच्या आरे कॉलनीत दोन गटात जोरदार राडा झाला. शिव मंदिरातील कळस यात्रेदरम्यान हा प्रकार घडला, त्यात चार जण जखमी झाले. याप्रकरणी 25 हून अधिक लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सध्या इथली परिस्थिती नियंत्रणात आहे.


याआधी रामनवमीच्या वेळी मानखुर्दमध्ये हिंसाचाराची घटना घडली होती. आता हनुमानजयंतीनंतर पुन्हा एकदा राज्यातली शांतता बिघडवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. 


सध्या राजधानी दिल्लीत जातीय दंगल पेटलीय. आता देशाच्या आर्थिक राजधानीत ते लोण पसरवण्याचा समाजकंटकांचा डाव तर नाही ना? असा संशय निर्माण झालाय. त्यामुळे सर्वांनीच खबरदारी घेणं गरजेचं आहे.