मुंबई : राज्यातील कोरोना संकटाला ( coronavirus) कसे सामोरे जायचे आहे आणि आपण कसे जात आहोत, याची माहिती देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आश्वासित केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी थेट संपर्क टाळून सोशल डिस्टन्सिंग (SocialDistancing)  पाळून जनतेला समाजमाध्यमांवरुन थेट संबोधित केले. हे त्यांचे संबोधित करणे चांगलेच प्रभावी आणि उपयुक्त  ठरले आहे. थेट प्रसारणानंतर टिकटॉक ॲपद्वारे १ कोटी ७७ लाख जणांनी त्यांचीभाषणे  पाहिली तर अन्य भाषणांनाही सरासरी पन्नास लाखांहून अधिक प्रतिसाद मिळाला आहे, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी आणि व्यापक असे प्रयत्न करीत आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे हे सुरवातीपासूनच सांगत आहेत. ते राज्यातील जनतेला समाज माध्यमावरुन थेट संबोधित करत आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने थेट संपर्क टाळून आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून केलेला हा समाज माध्यमाचा वापर प्रभावी आणि उपयुक्त ठरला आहे. मुख्यमंत्री यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने #CMOmaharashtra या फेसबुक आणि @CMOMaharashtra या ट्विटर हॅण्डलवरून अनेकदा थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे.



त्यांच्या या भाषणाच्या चित्रफिती यु-ट्यूबवरही आणि काही मुद्द्यांच्या अनुषंगाने फेसबुक संदेश म्हणूनही प्रसारित करण्यात आल्या आहेत. यात टिक-टॉक  या समाज माध्यमावरील चित्रफिती कोट्यवधींपर्यंत पोहोचल्याचे  दिसते. यातील भाषणांना एक कोटी ७७ लाख पासून ते ७८ लाख, ७७ लाख जणांनी प्रतिसाद दिला आहे. या भाषणांनी प्रतिसादाचा सरासरी पन्नास लाखांहून अधिकचा टप्पा गाठल्याचे दिसत आहे.



कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘घरातच राहा’ हा आणि अत्यावश्यक म्हणून बाहेर पडल्यास ‘सोशल डिस्टन्सिंग’ चा नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे, समाजमाध्यमातून वारंवार सांगितले. तसेच त्यांचे संभाषणही समाजमाध्यमातील फेसबूक, ट्विटर आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा प्रभावी ठरले आहे. तर मुख्यमंत्री यांच्या जनतेशी संवादाच्या लिंक या विविध वृत्त वाहिन्यांनीही थेट प्रक्षेपणात समाविष्ट केल्या. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांचा संदेश जनतेपर्यंत सहज आणि व्यापकरित्या शक्य झाल्याचे सांगण्यात आले.