राष्ट्रवादीचे मुंबईतील पदाधिकारी सदानंद लाड यांची आत्महत्या
चित्रपट निर्माते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील पदाधिकारी सदानंद तथा पप्पू लाड यांनी आत्महत्या केली.
मुंबई : चित्रपट निर्माते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील पदाधिकारी सदानंद तथा पप्पू लाड यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ग्रँट रोड परिसरातील लाडाचा गणपती मंदिरात बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह सापडला. हे मंदिर पप्पू लाड यांनीच बांधलेले आहे. त्यांच्या आत्महत्येचं नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पप्पू लाड यांनी १४ हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांचा मृतदेह जे. जे. रूग्णालयात पाठवण्यात आला असून दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
पप्पू लाड यांनी मराठीबरोबरच काही भोजपुरी सिनेमांची निर्मिती केली. त्यांचा देहांत हा सिनेमा विशेष गाजला. श्श्श… तो आलाय, कुंभारवाडा डोंगरी, माझ्या नवऱ्याची गर्लफ्रेंड या सिनेमांची चांगली चर्चा झाली. मात्र, ‘देहांत’ हा सिनेमा गाजला. या चित्रपटाचं लेखन प्रदीप म्हापसेकर यांनी केले होते तर प्रसिद्ध अभिनेते अशोक शिंदे यांनी या चित्रपटात काम केले होते.