COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Dehati Disco : गेल्या काही वर्षांमध्ये वैवाहिक जीवनात दोघात तिसऱ्याची एन्ट्री झाल्याच्या अनेक घटना आपण पाहिला आहे. बायकोचं मित्रासोबत अफेयर (affair), नवऱ्यांचं ऑफिसमधील महिलेशी संबंध...मग रंगहात पकडण्याचा सिलसिला सुरु होतो...अशा अनेक धक्कादायक घटना आपण बघितल्या किंवा वाचल्या आहेत. अगदी राजकीय नेत्यांचे किस्से असो किंवा सेलिब्रिटीचं घराबाहेरील लफड असेल...विवाहबाह्य संबंधच्या (Extramarital affair) घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशीच एक आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. 


रंगहात पडकल्यावर बायकोवर चढवली...


'देहाती डिस्को' आणि 'खली बाली' चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा यांच्या कृत्याने सिनेसृष्टीसोबतच सगळ्यांना एकच धक्का बसला आहे. झालं असं की, कमल किशोर मिश्रा गाडीमध्ये दुसऱ्या महिलेसोबत Romance करताना बायकोने रंगेहात पकडले. कारमध्ये आपल्या नवऱ्याचे आणि दुसऱ्या महिलेचे अश्लिल चाळे पाहून मिश्रा यांच्या बायकोने कारची काच फोडली. आपण पकडल्या गेलो म्हणून पळ काढण्यासाठी कमल यांनी गाडी सुरु केली. संतापजनक तेव्हा घडलं जेव्हा या महाशयाने कार बायकोच्या अंगावरुन नेली. ही सर्व धक्कादायक घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 



पोलिसांमध्ये तक्रार दाखल 


अंधेरी (पश्चिम)मधील निवासी इमारतीच्या पार्किंग परिसरात 19 ऑक्टोबरला ही घटना घडली आहे. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली आहे. सध्या पोलिसांनी चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्राविरुद्ध पत्नीला वाहनाने धडक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पत्नीच्या तक्रारीच्या आधारे मिश्राविरुद्ध अबोली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.


पाहा धक्कादायक व्हिडीओ