SSC HSC Exam Timetable:: फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी (HSC Exam) आणि इयत्ता दहावीच्या परीक्षेचं (SSC Exam) वेळापत्रक (Time Table) जाहीर करण्यात आलं आहे. यानुसार बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या दरम्यान होईल. इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीचे लेखी परीक्षांची वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. (Maharashtra Board exam)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेळापत्रकाबाबत सूचना असल्यास मंडळाकडे 15 दिवसांच्या आत लेखी स्वरूपात मागविण्यात आलेल्या होत्या. त्यातनंतर संघटना, पालक, शिक्षक यांचेकडून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन करून इ.12वी व इ.10वी ची वेळापत्रकं अंतिम करण्यात आलेली आहेत. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर या नऊ विभागासाठी मंडळातर्फे परीक्षा घेण्यात येणार आहे. विभागीय मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या वेबसाइटवर वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.


कोरोना काळात विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जादा वेळ देण्यात आला होता, पण यंदा अधिकचा वेळ देण्यात येणार नाही. कोरोनापूर्वी जशा परीक्षा होत्या तशाच 100 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहेत.


सीबीएसईच्याही तारखा जाहीर 
दरम्यान, सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Exam) दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च या दरम्यान घेतली जाणार आहे. तर बारावीच्या परीक्षा या 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिलदरम्यान होईल. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून cbse.gov.in या संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.