धक...धक...धक... कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांना दणका; काळी काच असणाऱ्यांनाही घेतलं फैलावर
उल्हासनगरात कर्णकर्कश आवाज करीत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या ३०० मॉडीफायर सायलेन्सर बुलेट, आणि ६४ ब्लॅक फिल्म असणाऱ्या चारचाकी वाहनानवर उल्हासनगर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.
उल्हासनगर : उल्हासनगरात कर्णकर्कश आवाज करीत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या ३०० मॉडीफायर सायलेन्सर बुलेट, आणि ६४ ब्लॅक फिल्म असणाऱ्या चारचाकी वाहनानवर उल्हासनगर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे.
फॉरवर्ड लाईन चौकात तसेच व्हीनस चौकात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलटच्या सायलेन्सरवर वाहन चालकांवर दंड कारवाई करून, त्या बुलेटचे सायलेन्सर काढून घेतले जात आहेत बुलेटच्या सायलेन्सरच्या कर्णकर्कश आवाजाने लहान मुले वृद्ध यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत असल्याने यापुढेही वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर आज कारवाई करण्यात येणार आहे.
राज्यातही अनेक गावगुंड अशा प्रकारे बुलेट गाडीचे सायलेन्सर मॉडिफाइड करून प्रचंड कर्कश आवाज करीत फिरीत असतात. अशा आवाजाने वृद्ध आणि लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तसेच आजुबाजून जाणाऱ्या येणाऱ्यांनाही याचा त्रास होतो. त्यामुळे राज्यभर अशा बुलेटविरांवर कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.