सायरा बानोंना धमकी देणाऱ्या बिल्डरविरोधात गुन्हा दाखल
ख्यातनाम ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन बिल्डर समीर भोजवानी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मुंबई : ख्यातनाम ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन बिल्डर समीर भोजवानी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
भोजवनी यांच्याकडून वारंवार धमक्या येत असल्याचा आणि जागेची खोटी कागदपत्रं केल्याचा आरोप सायरा बानो यांनी केला होता. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने हा गुन्हा दाखल केलाय.
पोलिसांना भोजवानी यांच्या घरात बेकायदेशीररित्या बाळगलेला शस्त्र साठा सापडला. बिल्डर भोजवनीकडून दिलीप कुमार यांचे पाली हिल, वांद्रे येथील घर बळकवण्याचा आरोप झाल्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण लागलंय.