आरे मेट्रो कारशेड आंदोलकांवरील गुन्हे अखेर मागे
आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारणीसाठी झाडं तोडण्यास पर्यावरणप्रेमींवर दाखल केलेले गुन्हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : आरेमध्ये मेट्रो कारशेड उभारणीसाठी झाडं तोडण्यास पर्यावरणप्रेमींवर दाखल केलेले गुन्हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत मागे घेतले. रत्नागिरीतल्या नाणार प्रकल्प आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या सूचना गृह विभागाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्यात. कोरेगाव भीमा प्रकरणातल्या सामाजिक कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.
याबद्दल सकारात्मक विचार करणार असल्याचं मंत्री नितीन राऊत यांनी स्पष्टीकरण दिलंय. तर मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे केलीय. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेते त्याकडे लक्ष लागलंय.