मुंबई : काळा चौकी येथील दत्ताराम लाड मार्गावरील गोदामाला भीषण आग लागली आहे. वेस्टर्न इंडिया मीलच्या गोदामाला ही आग लागली आहे. फर्निचरच्या गोदामाला ही आग लागल्याने आगीची तीव्रता अधिक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING










अग्नीशमनच्या दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अग्नीशमन दलाचे जवान करत आहेत. ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र आगीचं स्वरूप पाहता इथे मोठ् नुकसान झालं असावं असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.