मुंबई : कर्मवीर भाऊराव मार्गावरील मुंबई सत्र न्यायालयाच्या परिसरात आज सकाळी ७च्या सुमारास आग होती. सत्र न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावर सकाळी आग लागली होती.




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार सध्यातरी कुठलेही जीवितहानीचे वृत्त नाही. आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.


गेल्या काही दिवसांपूर्वीच कमला मिलमध्ये लागलेल्या आगीने सर्वांना धक्का दिला होता. लागोपाठ मुंबईत विविध ठिकाणी आगीच्या घटना घडत आहे. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे मुंबईला सध्या आगीने वेढले आहे की, काय असा प्रश्न पडला आहे.