मुंबई : १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमसह एकूण ५ दोषींवर आज कोर्टाने फैसला दिला. विशेष टाडा न्यायालय या पाच जणांना शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात दोषी ठरलेल्या सात जणांपैकी मुस्तफा डोसाचा तुरूंगात मृत्यू झाला आहे. तर अब्दुल कयूमला न्यायालयाने दोषमुक्त केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- पहिला निकाल करिमुल्लावर आला आहे. त्याला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सोबतच त्याला साडे सात लाखांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.


- अबू सालेमला देखील जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


- ताहेर मर्चंटला या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात आली आहे.


- रियाझ सिद्दीकी याला १० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


- फिरोज खान याला देखील फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.


१२ मार्च १९९३ रोजी मुंबई स्फोटांनी हादरली होती. यामध्ये २५७ जणांचा मृत्यू आणि ७१३ जण जखमी झाले होते. २७ कोटींच्या मालमत्तेचं नुकसान या स्फोटात झालं होतं. केवळ मुंबईच नाही तर अख्ख्या जगाला दहशतवादाचा नवा चेहरा दाखवणाऱ्या मुंबई साखळी स्फोटांच्या 'ब' खटल्यातील दोषींना शिक्षा सुनावली गेली आहे.