मुंबई : राज्यावर कोरोना संकट कायम आहे. कोरोना संकटामुळे यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा (Shivsena Dussehra Melava) रद्द करण्यात आला आहे. मात्र, शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दसरा मेळावा ऑनलाईन होणार आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना संकटामुळं यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा अपेक्षेप्रमाणे ऑनलाईन होणार आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दसरा मेळावा हा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याला हजारो शिवसैनिक उपस्थित असतात. मात्र कोरोनामुळं यंदा दसरा मेळावा होणार नाही, असे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 


शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा यंदा कोरोनाच्या सावटामुळे होणार नाही. दसरा मेळाव्याची शिवसेनेची परंपरा मोठी आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्यात ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान झाली आहे. त्यामुळे हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी दसरा मेळावा धुमधडाक्यात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, कोरोनामुळे होणारी गर्दी लक्षात घेवून हा मेळावा रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 


येत्या २५ ऑक्टोबरला दसरा आहे. हा दसरा मेळावा समाज माध्यमाच्या माध्यमातून होणार आहे. शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून सुरू असलेली परंपरा खंडित होणार नाही, असा शिवसेना नेतृत्वाचा प्रयत्न आहे. दरम्यान यापूर्वी पावसामुळे दसरा मेळावा रद्द करावा लागला होता. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा हा ऑनलाईन घेण्याचे ठरविण्यात आले आहे.