COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : पापलेट, सुरमई, बोंबिल, रावस, कुपा नावं ऐकली की खवैय्यांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहात नाही. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर मिळणारे हे सगळे मासे आता गायब झाल्याची धक्कादायक माहिती महाराष्ट्र मच्छिमार संघटनेनं दिली आहे. येत्या काही दिवसात मासळीचे दर वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आलीय. गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटक, गोवा, गुजरा आणि केरळमधून किनारपट्टीवरून होणाऱ्या अवैध मासेमारी करतात. पण अशी टंचाई कधीही निर्माण झाली नव्हती. त्यामुळे आता हे मासे गेले कुठे असा प्रश्न मच्छिमारांना पडला आहे. 


एलईडी लाईट मासेमारी कारण?


पर्सनीन जाळ्यांव्दारे एलईडी लाईट लावून केली जाणारी मासेमारी, ही मासळी टंचाईचे एक कारण असल्याचं मानलं जात आहे. या जाळ्यांमध्ये मोठ्या माशांसोबत लहान मासेही अडकुन मरतात, त्यामुळे मासे मिळण्यास अडचणी येत आहेत. यासोबतच समुद्रात सांडपाण्याव्दारे जाणारे प्लॅस्टिक, जागतिक वातावरणात झालेला बदल, समुद्रात येणारी चक्रीवादळामुळे माशांनी राज्याचा किनारा सोडला असल्याचे सांगितले जात आलं.