मुंबई : मुंबई कस्टम विभागाचे चार उपायुक्त आणि एका अधिकाऱ्याला ५० लाखांच्या लाचखोरी प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केलीय. कस्टम विभागाचे उपायुक्त मुकेश मीना, उपायुक्त राजीव कुमार सिंग, उपायुक्त सुदर्शन मीना, उपायुक्त संदीप यादव, अधीक्षक मनीष सिंग आणि खासगी सहाय्यक निलेश सिंग यांना अटक केलीय. कस्टममध्ये अडवण्यात आलेलं कन्साईन्मेंट सोडण्यासाठी या अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे ५० लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार सीबीआयकडे आली होती. यापैंकी पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता घेताना तिघांना सीबीआयनं रंगेहाथ पकडलं. 


या तिघांच्या चौकशीत इतर दोन कस्टम उपायुक्त आणि एका अधीक्षकाचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या अधिकाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयावर पोलिसांनी धाडी टाकल्या. या संदर्भातली काही कागदपत्रं ताब्यात घेण्यात आल्याचं सीबीआयच्या सू्त्रांनी सांगितलंय.