वाचा मनात कालवाकालव करणारी नीला सत्यनारायण यांची अखेरची सोशल मीडिया पोस्ट
एका आईच्या दृष्टीकोनातून लिहिलेली ही पोस्ट...
मुंबई : राज्याच्या पहिला महिला निवडणूक आयुक्त आणि प्रसिद्ध लेखिका नीला सत्यनारायण यांचं नुकतंच कोविड-१९च्या संसर्गामुळं निधन झालं. अंधेरी येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. सत्यनारायण यांच्या निधनाचं वृत्त कळताच अनेक क्षेत्रातील दिग्गदजांनी आणि सर्वसामान्यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिल्याचं पाहायला मिळालं. यामध्येच विशेष लक्ष वेधलं ते म्हणजे त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटनं.
नीला सत्यनारायण या कला आणि साहित्य क्षेत्रातही तितक्याच सक्रिय होत्या. समाजातील सद्यस्थिती जाणणारी एक संवेदनशील व्यक्ती कायमच त्यांच्या लेखणीतून पाहायला मिळाली. ज्या कोरोनामुळं त्यांना आपले प्राण गमवावे लागले त्याच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सत्यनारायण यांनी ल़ॉकडाऊनवर भाष्य करणारी एक अनुभवपर पोस्ट लिहिली होती. ही पोस्ट त्यांची अखेरची पोस्ट असल्याचंही कळत आहे.
सत्यनारायण यांनी या लॉकडाऊऩ डायरीत लिहिलेलं, 'जवळजवळ तीन महिने झाले या लॉकडाऊऩला. आधी भाजीपाला मिळायचा, वाण सामानही मिळायचं. आता तेही मिळेनासं झालं. कोणाकोणाला विनंती करुन सामान मागवलं. दूर जायचं म्हटलं तर, गाडी हवी, बस तर आता बंदच आहे. रस्स्त्यात पोलिसांची भीती. ते आपला अपमान करतील, गाडी जप्त करतील याची धास्ती.
घरात एक मतिमंद मुलगा. तो सैरभैर झालेला. त्याला कळत नाही की आजूबाजूला काय चाललं आहे, का चाललं आहे. त्याला रोज फिरुन यायची सवय आहे, ती त्याची गरज आहे. त्याला मी समजावू शकत नाही. मला फार हताश वाटतं. आपण एकमेकांशी बोलतो. मित्रांना फोन करतो. त्याने काय करावं? त्याची घुसमट कोणाला समजणार?'
The first page of the Lockdown Diary.
Posted by Neela Satyanarayana on Sunday, July 5, 2020
सत्यनारायण यांची ही पोस्ट एका आईच्या मनातील असंख्य प्रश्न आणि तिची घालमेल सर्वांसमोर मांडली. अनेकांच्याच मनात त्यांची ही पोस्ट आणि त्यांचे शब्द कालवाकालव करुन गेले.