मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. प्रमुख शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलावर होत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक मालेगाव, ठाणे, नवी मुंबई आदी ठिकाणी कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. आता चिंता करणारी बातमी समोर आली आहे. मंत्रालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सफाई कर्मचाऱ्यामुळे चार जण पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे.  सफाई कर्मचाऱ्यामुळे तिघांना बांधा झाली आहे. संपर्कात आलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रालयातील काही कर्मचारी सफाई कामगाराच्या संपर्कात आल्याने तिघांना बाधा झाली आहे. संपर्कात आलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. संपर्कात आलेल्या तिघा  कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मंत्रालयात याता चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सफाई कर्मचारी मंत्रालयात दाखल होण्याआधीच योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली नसल्याची बाब यानिमित्ताने पुढे आले आहे. 


राज्यात कोरोनासाठी त्रिस्तरीय उपचार व निगा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सध्या तीन वर्गवारीतील १६७७ उपचार केंद्र असून त्यामध्ये १ लाख ७६ हजार ३४७ विलगीकरण (आयसोलेशन) खाटांची संख्या आहे तर ७२४८ अतिदक्षता (आयसीयू) खाटांची उपलब्धता आहे. सुमारे तीन हजार व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत. ८० हजाराच्या आसपास पीपीई किटस तर २ लाख ८२ हजार एन ९५ मास्क उपलब्ध आहेत, अशा प्रकारे कोरोना उपचाराची सज्जता करण्यात आली आहे. 


दरम्यान, सोमवारी राज्यात काल ५२२ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता ८५९० अशी झाली आहे. यापैकी १२८२ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.