मध्य रेल्वेवर चार मेगाब्लॉक, पत्री पुलाच्या कामाला वेग
मध्य रेल्वेवर (Central Railway ) चार मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहेत
मुंबई : मध्य रेल्वेवर (Central Railway ) चार मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहेत. कल्याणमधील पत्री पुलाच्या कामासाठी हे चार मेगाब्लॉक मध्य रेल्वे प्रशासन घेणार आहे. २१, २२ आणि २८, २९ नोव्हेंबरला हे मेगाब्लॉक घेतले जातील.
पत्री पुलाचे ( Patri bridge) काम कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. या कामामुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे काम लवकर पूर्ण होवो आणि वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका होऊ दे अशीच इच्छा नागरिक व्यक्त करत आहेत.