मुंबई : मुंबईतील अतिशय धक्कादायक आणि मोठी बातमी. मुंबईतील अंधेरीच्या वर्सोवा भागात सिलेंडरच्या गोदामाला आग लागली आहे. .स्फोटामुळे परिसर हादरला असून चार जण जखमी झाल्याची माहिती अद्याप मिळाली आहे. अग्निशमन दलाच्या १६ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्यांवरून ही आग किती मोठी आहे याची माहिती मिळते. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मुंबईत वर्सोव्यात भीषण आग लागल्यामुळे पुन्हा एकदा आगीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून आगीचे सत्र सुरुच असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी तळोजा एमआयडीसीत असलेल्या एका रासायनिक कारखान्याला आग लागल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा मुंबई-वर्सोवा येथे सिलेंडरच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे.


घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १४ ते १६ गाड्या दाखल झाल्या असून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सिलेंडर गोदामाला आग लागल्यामुळे परिसरात स्फोटांचे मोठे आवाज होत आ आहे. मात्र, या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.