मुंबई : सर्वसामांन्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. सीएनजी पीएनजी (Cng-Png Rate) पुन्हा महागण्याची शक्यता आहे. सीएनजी इंधनाच्या किंमतीत अलिकडे 6 रुपयांची कपात करण्यात आली होती. मात्र त्याआधी जवळपास 10 महिन्यांत हे दर 37 रुपयांनी वधारले होते. त्यानंतर युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात सीएनजीच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. हे नवे दर ऑक्टोबरपासून नवे दर लागू होतील. त्यामुळे सर्वसामांन्याच्या खिशाला 'जाळ' लागण्याची शक्यता आहे. (fuel rate cng png rate likely to become expensive again)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

New Rules from 1st October: 1 ऑक्टोंबरपासून बॅंकेचे 'हे' नियम बदलणार, जाणून घ्या सविस्तर


रिक्षा टॅक्सी भाडेवाढीला मंजुरी?


मुंबईत रिक्षा टॅक्सी संघटनांनी संप मागे घेतला आहे. मुंबईत रिक्षा टॅक्सी भाडेवाढीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. भाडेवाढीला 1 ऑक्टोबर पासून मंजुरी मिळाली असून याबाबतची अधिकृत घोषणा सोमवारी होण्याची शक्यता आहे. रिक्षा टॅक्सी संघटनांच्या 16 मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. मुंबईत रिक्षा 2 रुपयाने तर टॅक्सीसाठी 3 रुपये भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.