मुंबई : अभिनेता अक्षय कुमार आणि त्याच्या कुटुंबीयांना पूर्ण सुरक्षा दिली जाईल असं पोलीस महासंचालक सतिश माथूर यांनी स्पष्ट केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढेच नाही तर जी व्यक्ती नक्षलवाद्यांना विरोध करेल आणि नक्षलवाद्यांच्या विरोधात लढा देणाऱ्या जवानांना प्रोत्साहन देऊन मदत करेल. त्यांनाही महाराष्ट्र पोलीस सरंक्षण देईल, असंही पोलीस महासंचालक सतिश माथूर यांनी स्पष्ट केले आहे.


नक्षलवाद्यांच्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुबीयांना आणि जखमी झालेल्या जवानांना अभिनेता अक्षय कुमारनं आर्थिक मदत केली होती. याचा राग मनात धरुन अक्षय कुमार आणि त्याच्या कुटुंबीयांना मारण्याचा कट नक्षलवाद्यांनी रचला होता याचा खुलासा एका पत्रकातून झाला होता.