मुंबई : काँग्रेसच्या (Congress) काही विशिष्ट खात्यांसोबत निधी वाटपाबाबात (Funds) दुजाभाव करण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला आहे. दरम्यान, नाराजी असली तरी चर्चेतून तोडगा निघेल, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी व्यक्त केली. काँग्रेसमध्ये नाराजी नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) दिली आहे.  



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निधी वाटपावरून महाविकासआघाडीत (Maha Vikas Aghadi government) धुसफूस पहायला मिळतेय. सरकारमध्ये काँग्रेसच्या काही विशिष्ट खात्यांबाबत दुजाभाव होतोय ही वस्तुस्थिती आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी आपण कालच बोललो आहोत असं ते म्हणाले. वीजबील माफ करण्याबाबत सरकारकडे पैसा नाही, महसूलही कमी आहे, तसंच इतर अनेक कारणं असल्याने सूट शक्य नाही असं ते म्हणालेत. 


तर निधी वाटपावरून काँग्रेसमध्ये कुठलीही नाराजी नसल्याचंृे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. तर निधी वाटप हे बसून ठरवता येते. यासंदर्भात मुख्यमंत्री सगळ्यांना बोलवून हा प्रश्न सोडवू शकतात, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटले आहे.