मुंबई : गणेशोत्सवाला अवघे ३ दिवस राहिले असताना बाप्पाच्या आगमनाची लगबग आपल्याकडे दिसत आहे. बाप्पाचे हटके रूप आपल्याकडे असावं अशी साऱ्यांचीच इच्छा असते. 

 

असाच प्रयत्न सगळेजण करत असतात. आपण आता पाहतोय मंडळातील अनेक गणपतीचे आगमन सोहळे पार पडले. १६ फुटी, १७ फुटी विराजमान असलेल्या या गणरायाचे रुप अगदी मनोहर आहेत. कुणाचा बाप्पा बाहुबली बनला आहे तर कुणाच्या बदकांवर विराजमान आहे. असं सगळं असताना आता घरगुती बाप्पा देखील वेगवेगळ्या ढंगात आपल्याला पाहायला मिळत आहे. काहींनी बालगणेशाची मूर्ती विराजमान करण्याचं ठरवलं आहे. तर काहींचा गट्टू बाप्पा यंदा घरी येणार आहे. असं सगळं असताना सिंधुदुर्गात मात्र अगदी अस्सल कोकणी बाप्पा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 


 

कोकणातील वैभव म्हणजे तेथील निसर्ग. या निसर्गाशी जोडलेल्या गोष्टींशी बाप्पाचं नवं रूप जोडलं गेलं आहे. कोकणात असलेल्या केळीच्या बागातील केळींवर विराजमान बाप्पा देखील दिसत आहे. तसेच कोकणातील निसर्ग फुलवणाऱ्या नारळाच्या झाडांचा देखील यामध्ये समावशे आहे. नारळांवर विराजमान बाप्पा देखील भाविकांनी बसवला आहे. तसेच कोकणची माणसं साधी भोळी असं म्हणतं कोकणातल्या माणसाची ज्या फळाशी तुलना केली जातो. तो फळ म्हणजे 'फणस' कोकणी माणूस म्हणजे बाहेरून फणसाच्या काट्यांसारखा कठोर पण आतुन अगदी रसाळ असतो. त्या फणसावर देखील बाप्पाला बसवून घरी आणणार आहे. 



 

गणरायाची ही रूप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांना बघुनच लोकं याचा आनंद लुटत आहेत.