मुंबई : सर्वत्र गणरायांचे आगमन मोठ्या धूमधडाक्यात आणि वाजतगाजत करण्यात आले. पर्यावरण रक्षणामुळे इकोफ्रेंडली गणपती, तशी सजावट आणि देखाव्यांची संकल्पना सर्वत्र पहायला मिळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक गणेशभक्त आपल्या घरी अगदी साध्या पद्धतीने गणपतीसाठी सजावट करतात. इकोफ्रेंडली गणपती साजरा करण्याचा आता प्रत्येकाने मानस केला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका इकोफ्रेंडली गणपतीचं दर्शन घडवणार आहोत.


पूर्वी भक्त झाडे, फुलांच्या माध्यमातून घरात सजावट करत असतं. आजही अनेक ठिकाणी अशाच प्रकारे गणपती सजावट पहायला मिळत आहे. मुंबईतील रेनबो एफएमची प्रसिद्ध आरजे सुनी हिनेही आपल्या घरी गणपती बाप्पासाठी इकोफ्रेंडली सजावट केली आहे. 


आरजे सुनी आपल्या घरी शाडूच्या मातीचा वापर करुन बनविण्यात आलेली बाप्पांची मुर्ती विराजमान केली आहे. तसेच सजावटीसाठीही झाडाच्या पानांचा वापर केला आहे. गावांप्रमाणे आता शहरातील गणेश भक्तांनीही घरांमध्ये इकोफ्रेंडली सजावट करण्यास सुरुवात केली आहे.



पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत असून गणेशोत्सवाच्या काळात प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती आणि थर्माकोलच्या डेकोरेशनमुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. हेच लक्षात घेऊन इकोफ्रेंडली गणपती विराजमान करण्यात येत आहेत.