Ganesh Chaturthi 2023 Video : लहानपण देगा देवा, असं प्रत्येकाला वाटतं. या धकाधकीच्या जीवनात आयुष्यातील संघर्षात अनेक वेळा निवांत बसल्यावर लहान मुलींचे जग बघितल्यावर आपसूकच तोंडातून हे शब्द बाहेर पडतात. लहानपणचं किती निरागस आणि टेन्शन फ्री असतं ना. या लहान मुलांचं जगच लयी भारी असतं. सध्या सर्वत्र वातावरण हे बाप्पामय झालं आहे. अशातच घरोघरी, मंडळात अगदी कानाकोपऱ्यात बघावं तिकडे गणरायाचं राज्य दिसतंय. अगदी सोशल मीडियावरही बाप्पामय झालं आहे. (Ganesh Chaturthi 2023 little boy ganpati video viral instagram trending now)


बाप्पासोबतचं निरागस नातं! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील kanda.le.lo या अकाऊंटवर एक चिमुकल्याचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे, आपला लाडका गणु! चिमुकल्याचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांना वेड लावतोय. खरंच बाप्पा आणि लहान मुलांचं नातं किती निरागस असतं ना. बाप्पा हा प्रत्येकाला आपल्या घरात हवा हवासा वाटतो. लहानपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाचा हा लाडका बाप्पा आपल्यासा वाटतो. 


हेसुद्धा वाचा - 'आमच्या पप्पांनी गणपती आणला…' रातोरात रीलस्टार झालेला चिमुकल्याचा व्हिडीओ पाहिला का?


उत्सव गणपतीचा सण आनंदाचा!


त्याचं लोभसवाणं रुप प्रत्येकाला आपल्या डोळ्यात सामावून घ्यावसं वाटतं. बाप्पाची प्रत्येक मूर्ती तितकीच गोंडस आणि निरागस असते. किती पाहू किती नाही असं वाटतं. अगदी आपलं मनंच भरत नाही. असंच काहीस या चिमुकल्याचं झालं. बाप्पाची मूर्ती पाहता क्षणीच तो त्यांचा प्रेमात पडला.


लहान मुलांना गणपती अतिशय प्रिय असतो. गणरायाच्या आगमनाने ते जेवढे आनंदी होतात, तेवढंच गणेश विसर्जनाला त्यांना अश्रूंना थांबवणं कठीण होतं. हत्तीचं डोके, मोठे कान, मोठे पोट आणि त्याच्या बालिश कथा लहान मुलांना खूप आवडतात. अगदी टिव्हीवरही ते गणरायाचे पिक्चर आणि कार्टुन पाहून अतिशय आनंदी होतात. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


त्यामुळे जेव्हा हा बाप्पा प्रत्यक्ष दिसतो घरात येतो तेव्हा त्यांच्या आनंदाला पारा उरत नाही. बाप्पा आणि लहान मुलांचं नातं मोदकासारखं असतं. गोडाचं सारण आणि तांदूळापासून तयार केलेलं आवरण... या व्हिडीओमधील चिमुकल्याचा निरागसपणा नेटकऱ्यांना प्रेमात पाडत आहे.