नवी मुंबई : भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर जिवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीडी पोलीस ठाण्यात दिपा चौहान या महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झालाय. गेली २७ वर्ष गणेश नाईक यांच्या बरोबर आपले लिव्ह इन रिलेशनमध्ये संबंध असल्याचा या महिलेने दावा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लिव्ह इन रिलेशनमधून झालेल्या मुलाला गणेश नाईक यांनी स्वीकारण्यास नकार देत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा महिलेचा आरोप आहे. आता या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने गणेश नाईक यांच्या अडचणी वाढल्या आहेत.


संबंधित महिलेने महाराष्ट्र महिला आयोगाकडे धाव घेतली होती. त्यानंतर संबंधित प्रकरणात चौकशी करुन कारवाई कण्याच्या सूचना महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलिसांना दिल्या होत्या.


गेल्या २७ वर्षांपासून 'लिव्ह इन रिलेशनशिप' मध्ये राहात असल्याचा खळबळजनक दावा महिलेने केला होता. मुलाला हक्क मिळावा अशी मागणी महिलेने केली आहे.