Ganeshotsav 2022 Rain Updates : यंदाच्या (Ganeshotsav 2022) गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून पावसानं काहीशी उसंत घेतलेली असतानाच (Mumbai Konkan) मुंबई आणि कोकणासह बहुतांश भागात गौरी आगमनासह पावसानंही पुनरागमन केल्याचं पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौरी पूजनाच्या दिवशी पहाटेपासूनच मुंबईत ढगांच्या गडगडाटासह पावसानं हजेरी लावली आहे. काही भागांत वीजांचा कडक़डाटही अनुभवायला मिळत आहे. थोडक्यात (Gauri Gnapati) गौरी- गणपतीच्या निमित्तानं घराबाहेर पडणार असाल, तर आजचा संपूर्ण दिवस पावसाची जोरदार हजेरी असणार आहे, हे विसरु नका. 


एकाएकी आलेल्या पावसामुळं मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली आहे. गणेशोत्सवाची धूम पाहण्यासाठी मुंबईत आलेल्या अनेक गणेश भक्तांनाही पावसानं पेचात पाडल्याचं पाहायला मिळत आहे. (Ganeshotsav 2022 Monsoon Rain IMD Weather Forecast Today Rainfall Alert ) 


पावसाचा मुक्काम लांबला 
सध्या मान्सून अखेरच्या टप्प्यात असला तरीही सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रात बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार. असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. 



(RAIN Updates) संपूर्ण देशात या कालावधीत सरासरीच्या तुलनेत 109 टक्के पाऊस होणार असल्याचं भारतीय हवामान विभागानं (IMD) जाहीर केलं आहे.


यंदाच्या मोसमात राज्यात समाधानकारक पाऊस झाला. मुख्य म्हणजे धरम क्षेत्रांमध्ये पावसाची कृपा पाहायला मिळाली. पण, राज्यातील काही भाग असाही होता, जिथं अवकाळीनं थैमान घातलं पण, मोसमी पावसानं शेतकऱ्यांना दगा दिला.