Video : Labaugcha Raja च्या मंडपात महिलांची फ्री स्टाइल हाणामारी; तर दर्शन रांगेत भक्तांची धक्काबुक्की
Labaugcha Raja 2023 : देशभरात सर्वत्र गणशोत्सवाची धामधूम आहे. त्यात मंडळात बाप्पाच्या दर्शनांसाठी भक्तगण गर्दी करत आहे. अशातच मुंबईतील प्रसिद्ध लालबाग राजाच्या मंडपातील महिलांची फ्री स्टाइल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Labaugcha Raja 2023 Video : देशभरात गणेशोत्सवाचा सण मोठ्या थाट्यामाट्यात साजरा होतो आहे. गणरायाचा आगमनामुळे सर्वत्र आनंददायी वातावरण आहे. शहरातील सार्वजनिक आणि मानाच्या गणेश मंडळात गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली आहे. मुंबईतील प्रसिद्ध लालबाग मंडपातही भक्तांचा झुंबड उडाली आहे. इथे सेलिब्रिटीसह अनेक राजकीय नेते बाप्पा चरणी नतमस्तक होण्यासाठी आवर्जून येतात. (ganeshotsav 2023 mumbai lalbaugcha raja ganpati Womens freestyle Fights and Clash shocking video viral on Internet trending now)
या गणरायची ख्याती अख्खा जगात पसरली आहे, त्यामुळे इथे भाविकांची प्रचंड खरेदी होते. गर्दी नियंत्रण ठेवण्यासाठी इथे असलेले मंडळाचे सेवक आणि पदाधिकारी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत असतात. अशातच गर्दीतील भाविकांचे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
पहिल्या घटनेत मंडपातील दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये धक्काबुक्की झाल्याच दिसून आलं आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये महिलांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी पाहिला मिळाली. गर्दी पोलीस आणि सुरक्षा रक्षकांच्या आवाक्याबाहेर गेल्याचं चित्र दिसून येतं आहे.
पाहा हाणामारी आणि धक्काबुक्कीचा व्हिडीओ -
दरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने लालबागच्या राजाचे दर्शन घेतलं. तर शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता अमित शाहा लालबागमध्ये दाखल होणार आहेत. अमित शाहा लालबागच्या राजाच्या दरबारात 25 मिनिटं असतील. शाहांच्या दौ-यासाठी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्याची तयारी सुरु झालीय. लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर अमित शाहा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळालाही भेट देणार आहेत.
दरवर्षी लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक गर्दी करत असतात. यंदाही मोठ्या संख्येने भाविक लालबाग राजाच्या मंडपात येत आहेत.