मुंबई : गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर आली असून आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची सर्वजण आतुरतेने वाट पहात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. मुंबई महापालिका आणि गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक आज पार पडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बैठकीत गतवर्षीची नियमवाली कायम राहील असा निर्णय घेण्यात आला आहे.  गणेश दर्शनासाठी भाविकांना परवानगी द्यावी का याचा निर्णय वरीष्ठ पातळीवर घेण्यात येणार आहे. 


मोठ्या मंडळाच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात न करता विसर्जनस्थळी (चौपट्यावर) विसर्जन करता येणार आहे. तसंच ठराविक कार्यकर्त्यांसह विसर्जन करता येणार असून, विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही, असंही बैठकीत ठरलं आहे. 


अशी असेल नियमावली


- सार्वजनिक गणेशमूर्ती 4 फूट असावी


- घरगुती गणेशमूर्ती 2 फूट असावी


- गर्दी होणार नाही याची काळजी गणेशमंडळांनी घ्यावी


- 84 गणेश विसर्जन ठिकाणं


- विसर्जन ठिकाणी महापालिकाला मूर्ती द्यावी लागेल 


-  नंतर महापालिका गणेश विसर्जन करणार  


- सार्वजनिक मूर्ती विसर्जन साठी 10 कार्यकर्त्यांना परवानगी


- लहान मुले आणि जेष्ठांनी विसर्जनसाठी जाऊ नये


- ऑनलाईन दर्शनाची सोय करावी