मुंबई : गणेशोत्सवात मंडळांकडून दिल्या जाणाऱ्या प्रसादावर यंदा अन्न आणि औषध प्रशासनाची नजर असणार आहे. प्रशासनाने सर्व मंडळांसाठी विशेष सूचना जारी केल्या आहेत. गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, प्रसाद उत्पादक आणि अन्नपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांनी या सूचनाचं काटेकोर पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसादाबाबत काही तक्रारी किंवा सूचना असल्यास १८००२२२३६५ या एफडीएच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. गणेश मंडळांनीही याला सकारात्मक प्रतिसाद देत सुरक्षित गणेशोत्सव साजरा करण्याची हमी दिली आहे. 


बाप्पाच्या स्वागताची तयारी जोरात सुरूय. मूर्तीपासून प्रसादापर्यंत आणि मखरापासून फुलांपर्यंत सारंच महागलंय. पण बाप्पाचं स्वागत करायचंय तर महागाईही चालेल असाच नूर दिसतोय. सुखकर्त्यांची येण्याची लगबग आता सर्वबाजारपेठांमध्ये पाहायला मिळते, परंतु यंदा बाप्पांच्या आगमनासाठी लागणारे खर्चाचे बजेट काहीसे वाढले आहे.


दरम्यान, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा गजर करत चाकरमानी कोकणाकडे निघाले आहेत. एसटी महामंडळानं यंदा अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था केली आहे आणि त्याला गणेशभक्तांचा चांगला प्रतिसाद मिळालाय. बसची बहुतांश आरक्षणं फुल आहेत. खासगी वाहतुकदारांनीही आपला मोर्चा कोकणाकडे वळवला आहे. गणेशोत्सवाला दोन दिवस बाकी असताना गावाकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यासाठी हे गणेशभक्त सहकुटुंब निघाले आहेत.